अहेरी : दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.हा दिवस महिलांच्या समान हक्कांना आणि समानतेला प्रोत्साहन देतो.त्यांच्या कामगिरीवर प्रकाश टाकतो.हा दिवस महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.महिला दिन निमित्य ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करून समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला जाते.
आज जागतिक महिला दिन निमित्त अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील प्रसिद्ध असलेल्या श्रीराम मंदिर येथे जागतिक महिला दिन निमित्त लोकमत संकी मंच आलापल्ली व नागेपल्ली तर्फे महिलांचा सत्कार समारंभ,मार्गदर्शन शिबीर कार्यक्रम आयोजित केले आहे.या कार्यक्रमला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला मार्गदर्शन केले.
यावेळी हणमंतू मडावी आदिवासी सेल जिल्हा अध्यक्ष,गणवीर साहेब पोरेस्ट विभाग,विजय खरवडे ,लोणबले सर,रोशनिताई बुराडे,मुक्कावार ताई,विशाखा म्याडम,डॉ.कावडे म्याडम,अलोने म्याडम माजी ग्रा.प.सदस्य,सुगंदा मडावी माजी सरपंच,खोब्रागडे म्याडम ग्रा.प.सदस्य,बुरांडे सर,खरवडे काकू,नेरलवार,कवडुजी चलावार ,नागापूरे काका,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक न.प.अहेरी तसेच सर्व लोकमत सखी मंच आलापल्ली व नागेपल्ली महिला मंडळ होते.