मुलचेरा : तालुक्यातील कांचनपूर येथील दरवर्षी प्रमाणे यंदाही श्रीश्री कालीमाता सार्वजनिक पूजा कार्यक्रम आयोजित केले आहे.येथील काली माता पूजा कार्यक्रम दोन दिवस आयोजन केले जाते.कालीमाता पूजा कार्यक्रम मोठ्या उत्सहात पार पडतात.काल कार्यक्रमला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी उपस्थित राहून माँ काली मातेची विधिवात पूजा अर्चना करून दर्शन घेतले.
यावेळी कवडूजी चालवार,आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण,छोटू काका,राजीव विश्वास,अजय मडल,सुदर्शन समदर, बिमाई सरकार,शंकर कराती,सुरेश बाला,चिन्मय रॉय,तापस मडल,प्रमोद गोडसेलवारसह स्थानिक आविसं काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.