


गडचिरोली : अहेरी तालुक्यातील विविध शासकीय योजनांमध्ये अनियमितता होत असल्याचा आरोप माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी आज बुधवारी रोजी जिल्हा परिषद कार्यालया समोर आमरण उपोषणाला सुरवात केली.त्यांनी 30 जून रोजी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन पाठवून प्रशासनाच्या दुर्लक्षावार तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कंकडालवारांच्या मते अहेरी व भामरागड तालुक्यातील अंगणवाडी भरतीपासून ते जलजीवन मिशनच्या कामांपर्यंत
विविध योजना भ्रष्टाचाराच्या
गर्तेत अडकल्या असून,नागरिकांना अपेक्षित लाभ
मिळालेला नाही.काही ठिकाणी
पाणीपुरवठ्याच्या योजनांमध्ये
निकृष्ट दर्जाचे पाईप व
नळजोडणी करून लाखो
रुपयांची कामे अपूर्ण ठेवण्यात
आली आहेत तसेच काही
ठिकाणी एकाच कामाचा अनेकयंत्रणामार्फत दाखला देत आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला आहे.
भामरागड तालुक्यातील विकास कामांमध्येही गंभीर त्रुटी असून.योजनेच्या नावाखाली कामांच्या केवळ कागदोपत्री अस्तित्व आहे.काही
कामांत डोंगरातील मोठे दगड
वापरून केवळ औपचारिकता
पूर्ण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.योजनांची फलकंही लावलेली नसून पारदर्शकतेचा पूर्ण अभाव दिसून येतो.या सर्व बाबींची वेळोवेळी चौकशीची मागणी करूनही
कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अजय कंकडालवार
यांनी आंदोलनाचा
मार्ग
स्वीकारलाआहे.यासंदर्भात
त्यांनीजिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक,उपविभागीय अधिकारी,तहसीलदार व पोलिस निरीक्षक
यांना प्रतिलिपी पाठवली आहे.
उपोषण मंडपाला भाजपाचे नेते तथा गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार मा.श्री अशोकजी नेते आणि मा.श्री.वासुदेव सेडमाके ( जिल्हाध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) यांनी भेट देऊन उपोषणा जाहीर पाठिंबा दिले.
यावेळी उपस्थित.
हणमंतु मडावी आदिवासी सेल काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष गडचिरोली, अजय नैताम . माजी जी. प्.सदस्य, प्रशांत गोडसेलवार नगर पंचायत नगर सेवक अहेरी,कार्तिक भाऊ तोगम माजी उप सरपंच, अज्जू भैय्या पठाण माजी सरपंच आलापल्ली, राजू दुर्गे ग्रा. प .सदस्य महागाव, शिवराम भाऊ पुल्लुरी,नरेश गर्गम् सामाजिक कार्यकर्ते, उमेश रामटेके,सचिन भाऊ पांचार्या ,प्रमोद गोडसेलवार,पिंटू मडावी,प्रवीण कोरेत,शोभन कोंड्रावार आदी उपस्थित होते.