सिरोंचा : आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे.
प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव अजयभाऊ कंकडालवार आणि प्रदेश सचिव हणमंतू मडावी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखल करित शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाची झेंडा हाती घेतलं आहे.सिरोंचा येथे शुकवारला पार पडलेल्या काँग्रेस पक्षाचे बैठकीत शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांच्या साक्षीने पक्ष प्रवेश सोहळा मोठ्या थाटात उरकला.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर सदरहू पक्ष प्रवेशामुळे तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांना धक्का लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव अजय कंकडालवार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हनमंतू मडावी यांनी पक्षाचे दुपट्टे टाकून पुष्पगुछ देऊन काँग्रेस पक्षात स्वागत केले.तालुक्यातील अमरावती, नारायणपूर,गरकापेठा,सिरकोंडा, वेनलाया,बोगापूर,रंगय्यापल्ली आदि गावांमधील विविध पक्षाचे तरुण कार्यकर्त्यांच्या समावेश आहे.
Home मुख्य बातम्या सिरोंचा तालुक्यातील विविध पक्षाचे शेकडो तरुण कार्यकर्त्यांची काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश : काँग्रेस नेते...





