सिरोंचा : तालुक्यातील 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या पेंटीपाका ग्राम पंचायत अंतर्गत येणारी मणीक्यापुर गावात
मूलकला फाउंडेशनच्या माध्यमातून माणिक्यापुर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शाळकरी विध्यार्थीना मूलकला फाउंडेशन अध्यक्ष – सागर भाऊ मूलकला आणि कार्यकर्ते – राजू मूलकला, उदय मूलकला ,सतीश पैकाराव, रणजित, यांच्या पुढाकारातून मोफत नोटबुक आणि पेनची वाटप करण्यात आले आहे.त्यावेळी मूलकला फाउंडेशनचे अध्यक्ष – सागर भाऊ मूलकला यांनी बोलत तालुक्यातील ग्रामीण भागातील आजही अनेक गावे विकासापासून वंचित आहे.अनेक गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकगण नसून गरीब विद्यार्थी/विध्यार्थीनीनी शिक्षणापासून वंचित राहावा लागत आहे.असे अनेक समस्या ग्रामीण भागातील असलेल्या शाळेत दिसून येत आहे.त्याकरिता मूलकला मदत फाउंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण भागातील असलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांना मोफत नोटबुक आणि पेन इतर साहित्य फाउंडेशनच्या माध्यमातून वाटप करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले आहे
त्यावेळी माणिक्यापुर गावाचे शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी, विध्यार्थीचे पालक वर्ग आणि गावकरी उपस्थित होते
Home सिरोंचा मूलकला फाउंडेशनच्या पुढाकारातून माणिक्यापूर गावातील शाळेकरी विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकची वाटप