अहेरी : हिंदू धर्मात श्री गणेश हे आद्यदैवत मानले जातात.प्रत्येक मांगलिक कामापासून ते धार्मिक विधीमध्ये श्री गणेशाची प्रथम पूजा-उपासना केली जाते.त्यानंतर इतर सर्व देवी – देवतांची पूजा केली जाते.प्रत्येक घरा-घरात गणपतीची पूजा केली जाते.भाविक गणेशाला विघ्नहर्ता म्हणतात.ज्या घरावर गणेशाचा आशीर्वाद असतो,त्या घरात नेहमीच सुख-समृद्धी असते असे मानले जाते.
1 फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती निमित्त सगळीकडे उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आला होता.त्या निमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील प्रसिद्ध असलेल्या श्री गणेश मंदिर येथे माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी परिवारांकडून विविध कार्यक्रमासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आला.
काल माघी गणेश जयंतीचा शुभ मुहूर्तावर दोन्ही परिवारातील सर्व सदस्यांनी श्री गणरायाची विधिवत पूजा अर्चना करून श्रीबाप्पाची दर्शन घेतले.तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे कार्यक्रमही ठेवण्यात आल होता.उपस्थित भाविक तसेच स्थानिक नागरिकानी महाप्रसादाचे आस्वाद घेतले.
त्यावेळी काँग्रेसनेते अजय कंकडालवार व हणमंतु मडावी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील समस्त जनतेला सुख शांती समृद्धी लाभोयासाठी श्रीबाप्पाकडे प्रार्थना केली.यावेळी कंकडालवार,मडावी परिवारातील सर्व सदस्य तसेच स्थानिक नागरिक,भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home अहेरी काँग्रेसनेते कंकडालवार व मडावी परिवारांकडून माघी श्री गणेश जयंती निमित्त महाप्रसाद कार्यक्रम...