Home मुख्य बातम्या आमदार विजय वडेट्टीवार व खासदार डॉ.किरसान यांच्या मध्यस्थीने कंकडालवार यांचे आंदोलन तूर्तास...

आमदार विजय वडेट्टीवार व खासदार डॉ.किरसान यांच्या मध्यस्थीने कंकडालवार यांचे आंदोलन तूर्तास स्थगित

3
0

गडचिरोली : भामरागड व अहेरी तालुक्यातील विविध शासकीय योजनांमध्ये अनियमितता होत असल्याचा आरोप करत माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्हा परिषद कार्यालयासमोर कालपासून बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केले होते.

आज कंकडालवार यांचे उपोषण मंडपाला काँग्रेसचे विधी मंडळ पक्षनेते तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार आणि खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी मागण्यासंदर्भात प्रदीर्घ चर्चा केली.तदनंतर आमदार वडेट्टीवार व खासदार डॉ.किरसान यांनी उपोषणकर्ते कंकडालवार यांची मध्यस्ती करत त्यांची समजूत काढले. दोषींवर प्रशासकीय कारवाईसाठी योग्य पाठपुरावा करून वेळ प्रसंगी या पावसाळी अधिवेशनात सर्व मागण्या उचलून धरण्याचे आश्वासन आमदार वडेट्टीवार यांनी आश्वस्त केले होते.

            लोकप्रतिनिधीनीं दिलेल्या आश्वासानावर उपोषणकर्ते कंकडालवार यांनी समाधान व्यक्त केल्याने आमदार वडेट्टीवार आणि खासदार डॉ. किरसान यांनी निंबू शरबत पाजून कंकडालवार यांचे बेमुदत आमरण उपोषण सोडविले.यावेळी उपोषणकर्ते अजयभाऊ कंकडालवार यांनी आपले आंदोलन तूर्तास मागे घेत असल्याचे जाहीर केले.

जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे  उपोषण सोडवित असतांना उपोषण मंडपात आदिवासी सेल काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष हणमंतू मडावी,ज्येष्ठ नेते अशोक रापेल्लीवार,जि.प.माजी सदस्य अजय नैताम,महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष ऍड.कविता मोहोरकर,अनुजाती सेल जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे,परिवहन आघाडीचे जिलाध्यक्ष नवघरे,स्वीकृत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,कार्तिक भाऊ तोगम माजी उप सरपंच,अज्जू पठाण माजी सरपंच आलापल्ली,राजू दुर्गे ग्रा.प.सदस्य महागाव,शिवराम पुल्लुरी,नरेश गर्गम् सामाजिक कार्यकर्ते, उमेश रामटेके,सचिन पांचार्या ,प्रमोद गोडसेलवार,पिंटू मडावी,प्रवीण कोरेत,शोभन कोंड्रावार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here