Home सिरोंचा सिरोंचा येथील डिजिटल मीडिया समूहाकडून तहसीलदार शिकतोडे यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा

सिरोंचा येथील डिजिटल मीडिया समूहाकडून तहसीलदार शिकतोडे यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा

54
0

सिरोंचा : तहसीलदार व येथील नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी जितेंद्र शिकतोडे यांचा वाढदिवसानिमित्य सिरोंचा येथील डिजिटल मीडिया समूहाकडून त्यांना त्यांच्या कक्षेत पुष्पगुच्छ देऊन व  केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.तहसीलदार शिकतोडे हे सिरोंचा येथे रुजू झाल्यापासून सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेत ते आपल्यास्तरावरून सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे.त्यांच्या अनेक कामांची दखल घेत डिजिटल मीडिया समूहाने त्यांच्या वाढदिवस साजरा करण्याचा ठरविले.यावेळी सिरोंचा येथील डिजिटल मीडियाचे विविध नामवंत युट्युब चॅनेल व न्यूज पोर्टलचे प्रतिनिधींनी व पदाधिकाऱ्यांनी त्यांना केक भरवून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.

या वाढदिवस कार्यक्रमाला डिजिटल मीडिया प्रमुख व एन.टी.व्ही.युट्युबचॅनेलचे प्रतिनिधी सागर मुलकाला,सचिव व स्टार महाराष्ट्र युट्यूब चॅनेलचे प्रतिनिधी श्याम बेज्जनीवार,डिजिटल मीडिया सल्लागार व विदर्भक्रांती न्यूजपोर्टलचे मुख्य संपादक रवी सल्लमवार, न्यूज 24 मराठी युट्युब चॅनेलचे प्रतिनिधी सुधाकर शिडाम,जनशक्ती युट्युब चॅनेल प्रतिनिधी शंकर जिमडे, LA6 युट्युब चॅनेलचे प्रतिनिधी शेख जलील फाशा आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here