Home अहेरी अजय कंकडालवारच्या नावातच सेवा,अनेक रुग्णांना मिळणार जीवनदान : आदिवासी दिनाच्या औचित्य साधून...

अजय कंकडालवारच्या नावातच सेवा,अनेक रुग्णांना मिळणार जीवनदान : आदिवासी दिनाच्या औचित्य साधून मोफत रुग्णवाहिकेचे अहेरीत लोकार्पण

41
0

अहेरी  : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.श्री.अजय कंकडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली  समाजातील गोर गरीब गरजू लोकांची अहेरी सारख्या मोठ्या शहरात हॉस्पिटल संदर्भात होणारी परवड,त्रास, व आर्थिक संकटाच्या बाबतीत?

तळमळीने दखल घेऊन समाजातील पूर्ण प्रशासकिय यंत्रणेची कायदेशीर माहिती असणारे व अत्यंत कमी वयात सामाजिक कार्याची आवड असल्याने,प्रत्यक्षात रुग्णांना काळजी पूर्वक आपुलकीने मदत पोहचविणारे अजय कंकडालवार यांच्या नावातच सेवा,आता अनेक रुग्णांना जीवनदान मिळणार आहे.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अहेरी सारख्या शहरात योग्य उपचार मिळतील या आशेने अहेरी उपविभागातील खेड्यापाड्यातून गोर गरीब रुग्ण इकडे येतात.

परंतु आर्थिक कमजोरी,माहितीचा अभाव तसेच रहाण्याची सोय नसल्याने त्यांचे खूप हाल होतात.केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य संदर्भात खूप साऱ्या योजना देखील आहेत.परंतु त्या प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी सुद्धा अजय कंकडालवार हे अगदी जलदगतीने कार्य करीत आहे.

अहेरी उपविभागातील गोर गरीब रुग्णांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करणे,मोफत रुग्णवाहीका सेवा पुरविल्या जाव्यात.त्याकरिता आपण गोरगरीब जनतेसाठी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली असल्याचे अजय कंकडालवार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here