अहेरी टुडे न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी ( Aheri )
अहेरी : संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. त्याअनुषंगाने, संपूर्ण देशात एकाच वेळी आतंरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो.व्यक्तीच्या शारीरिक आणि आध्यात्मिक विकासासाठी योग विद्या सहाय्यभूत आहे.आंतरराष्ट्रीय योग दिनाचा औचित्य साधून उद्या सकाळी ५.३० वाजता अहेरी येथे स्व. राजे विश्वेश्वरराव महाराज स्टेडियम (हॉकी ग्राऊंडवर) योग दिन कार्यक्रम भाजपा,पतंजली योग सेवा समिती अहेरी व विठ्ठल रखुमाई विवाह सोहळा समिती तर्फे आयोजित करण्यात आले.तरी सर्व योगा प्रेमींनी शिबिरात उपस्थित होवून लाभ घ्यावा असे आवाहन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले!