Home अहेरी खेळाडूनी खचून ना’जाता आत्मविश्वासनी खेळ खेळले पाहिजे :अजयभाऊ कंकडालवार यांचे प्रतिपादन

खेळाडूनी खचून ना’जाता आत्मविश्वासनी खेळ खेळले पाहिजे :अजयभाऊ कंकडालवार यांचे प्रतिपादन

8
0

अहेरी : तालुक्यातील तिमरम ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मौजा झिमेला येथील कुमरम भीम व्हाॅलीबाॅल क्लब यांच्या सौजन्याने भव्य ग्रामीण व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेची उदघाटन आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली आहे.

त्यावेळी उदघाटन स्थानावरून बोलतांना माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी बोलले की’आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणा बरोबरच खेळाला महत्त्व प्राप्त झाले आहे.खेळामुळे क्रीडा गुणांना चालना मिळते प्रत्येक युवकांमध्ये क्रीडा गुण असतात त्यांना योग्य ते मार्गदर्शन व क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.खेळाडूंनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगुण क्रीडा क्षेत्रात पुढे यावे आणि जिल्ह्याचा व क्षेत्राचा नावलौकीक वाढवावा.

पुढे बोलताना म्हणाले आज पर्यंत या गावाकडे लोकप्रतनिधीच दुर्लक्ष केल्या जात असल्याने या ठिकाणी अनेक समस्या आवसून उभे आहेत.याकडे मात्र लक्ष देण्यास तयार नाहीत मात्र येणाऱ्या काळात आपण सहकार्य केल्यास मी या गावातील समस्या सोळविण्यासाठी प्रत्यन करणार असून आज पासून सुरू झालेल्या व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे सर्व खेळाडूनी परजय झाले म्हणुन खचून न जाता आत्मविश्वासनी खेळ खेळावे असे प्रतिपादन केले.

या व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार – आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.दुसरा पारितोषिक वन पारीक्षेत्र अधिकारी कडून देण्यात येत आहे.तृतीय पारितोषिक ग्रामपंचायत कडून देण्यात येत आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हणमंतू मडावी होते.यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी पंचायत समिती सभापती भास्करभाऊ तलांडे,देवलमरीचे उपसरपंच हरीश गावडे,माजी सरपंच विद्यमान सदस्य गुलाबराव सोयांम,माजी सरपंच अशोकभाऊ येलमुले,तीमरमचे ग्राम पंचायत सदस्यदिवाकर गावडे,नंदिगावचे पोलीस पाटील सुधाकर आलाम,तीमरमचे पेसा अध्यक्ष अचीतराव सिडाम,झीमेलाचे पेसा अधक्ष्य आत्रामभाऊ,माजी सरपंच महेश मडावी,उपसरपंच सरोजा पेंदाम,माजी सरपंच समया पेंदाम,प्रतिष्ठीत नागरीक रंगाजी गावडे, मेश बामणकर पत्रकार,सामाजिक कार्यकर्ता नरेंद्र गर्गम,माजी उपसरपंच कार्तिक तोगम,तिरुपती सडमेक,दिपक गेडामतीमरमचे ग्राम पंचायत सदस्यदिवाकर गावडे,नंदिगावचे पोलीस पाटील सुधाकर आलाम,तीमरमचे पेसा अध्यक्ष अचीतराव सिडाम, झीमेलाचे पेसा अधक्ष्य आत्राम भाऊ,माजी सरपंच महेश मडावी,तीमरमचे सरपंच सरोजा पेंदाम,माजी सरपंच धर्मराज पोरतेट,माजी सरपंच समया पेंदाम,प्रतिष्ठीत नागरीक रंगाजी गावडे, रमेश बामणकर पत्रकार,तिरुपती सडमेक,दिपक गेडाम,बापूजी सिडाम, गावडे काका, माधव आत्राम, रविन्द्र मडावी,सुरेश पोरतेट, विनोद तोरेम,तुळशीराम सडमेक,कमलेश सिडाम,आनदराव आत्राम,काँग्रेस कार्यकर्ते दिवाकर आलाम,दिपक गेडाम,महेश मडावी,राहुल गेडाम,राहुल पोरतेट,अमन गेडाम,महेश सिडाम, विपुल पोरतेट, रोशन सडमेक,बापूजी सिडाम,गावडे काका,माधव आत्राम, रविन्द्र मडावी,सुरेश पोरतेट, विनोद तोरेम, तुळशीराम सडमेक,कमलेश सिडाम,आनदराव आत्राम,काँग्रेस कार्यकर्ते दिवाकर आलाम,दिपक गेडाम,महेश मडावी,राहुल गेडाम, राहुल पोरतेट,अमन गेडाम, महेश सिडाम,विपुल पोरतेट,रोशन सडमेकसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मंडळातील पदाधिकारी सदस्यसह गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष उपध्याक्ष सदस्य सहकार्य केले संचालन व आभार रमेश बामनकर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here