भामरागड : तालुक्यातील हितापाडी येथील जय सेवा क्रिडा मंडळ हिदूर व हितापाडी यांच्या सौजन्याने भव्य ग्रामीण क्रिकेट व व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजित केले आहे.या स्पर्धेची उदघाटन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली आहे.
क्रिकेट व व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार कडून देण्यात येत आहे.क्रिकेट द्वितीय पारितोषिक आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी कडून,व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी गुंडारू आलम सर मुख्याध्यापक कडून,क्रिकेट तृतीय पारितोषिक ग्रामपंचायत अरेवाडा कडून,व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी श्रीमती हेमलता परसा गटशिक्षणाधिकारी ( प्राथ ) गडचिरोली कडून देण्यात येत आहे.
यावेळी लक्ष्मीकांत बोगामी काँग्रेस तालुका अध्यक्ष भामरागड,चालावार काका,रंजना ताई पुंगाटी उपसरपंच आरेवाडा,सडमेकताई सदस्य,विष्णू मडावी नगरपंचायत उपाध्यक्ष भामरागड,प्रभाकर मडावी,वरसे काका,रामाजी पुंगाटी ग्रा.प.सदस्य आरेवाडा, सोमजी पुंगाटी पोलीस पाटील,रैनू वड्डे,सोमा परसा, रामा पुंगाटी, देवाजी गोटा,देवाजी हबका,गणेश गावडे,पांडू पुंगाटी, केशव परसा,सुधाकर परसा,पांडू नरोटे,झुरू पुंगाटी,आदित्य परसा,सुरेश पुंगाटीसह गावातील नागरीक तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा हस्ते भव्य ग्रामीण क्रिकेट व व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे...