भामरागड : तालुक्यातील आरेवाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील विविध समस्या संदर्भात अलीकडेच बैठक घेण्यात आली.तेंदूपान संकलनाची रक्कम अद्याप नागरिकांना न मिळाल्याने ग्रामस्थांनी ही बाब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे मांडली.
यावेळी अजयभाऊ यांनी आरेवाडा येथे भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.ग्रामपंचायत सचिवांना त्यांनी स्पष्ट सूचना देत तातडीने नागरिकांना तेंदू संकलनाची रक्कम वितरित करण्यास सांगितले.तसेच गावातील वीज,पाणी, रस्ते व आरोग्य या महत्त्वाच्या विषयांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव हणमंत मडावी,भामरागड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोंगले,आरेवाडा ग्राम पंचायतचे सरपंच, सचिव,सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.