अहेरी : तालुक्यातील खुदीरामपल्ली येथील खुदीराम बोस स्पोर्टींग क्लब खुदीरामपल्ली द्वारे भव्य फुटबॉल स्पर्धेची आयोजित केले आहे.सदर फुटबॉल स्पर्धेसाठी काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजय कंकडालवार यांचा कडून पहिला पारितोषिक देण्यात येत आहे.दुसरा पारितोषिक आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी कडून तसेच तिसरा पारितोषिक ग्रामपंचायत सदस्य शुभम शेंडे आणि सुकुमार दास पण चौथा पारितोषिक पिनाकी चौधरी कडून देण्यात येत आहे.फुटबॉल स्पर्धेसाठी असे चार पुरस्कार ठेवण्यात आले तसेच परिसरातील अनेक संघ भाग घेतले.
फुटबॉल सामन्याची उदघाटन काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते संपन्न झाल आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष मा.हणमंतू मडावी साहेब उपस्थित होते.माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार व आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष मडावी यांनी गावात आगमन होताच गावातील नागरिकांनी विविध नूत्य करत ढोल ताशाने जंगी स्वागत केली.
यावेळी विनोद दास,कमलेश सरकार,विजय विश्वास,सविता परेश,वर्मन पोलीस पाटील,रमेन दास,शंकर दास,निर्मल दास सर,हितेश हलदार,परेश वर्मनं,सुकुमार दास,विश्वमंगल पाल,सुनील दाससह परिसरातील क्रीडा प्रेमी तसेच गावातील समस्त नागरिक उपस्थित होते.