अहेरी : तालुक्यातील वेंकटापूर येथील रहिवाशी बाबुराव कोरेत यांची मुलगी कु.रोशनी कोरेत वय ( 25 वर्षी ) हिला काही महिन्यापासून डोळ्यांची समस्या होती.रोशनी कोरेतची कुटुंब हे अंत्यत गरीब असल्याने डोळ्याची खाजगी दवाखान्यात उपचार करून आर्थिक अडचणीचे ठरत होते.मागील दोन वर्षांपासून रोशनीचे दोन्ही डोळे निकामी झाले होते.मागील दोन वर्षांपासून रोशनीचे कुटुंबियांनी अनेकांकडे मदतीचे अपेक्षा बाळगले होते.परंतु कोणीही मदतीचे हात पसरवले नव्हते.
शेवटी सदर बाब माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांना माहिती मिळताच कंकडालवार यांनी कु.रोशनी हिला चंद्रपूर येथील एका डोळ्यांच्या खाजगी दवाखान्यात भर्ती करून डोळ्याची ऑफरेशन आणि औषधं उपचाराचे संपूर्ण खर्च उचलले. अन त्यांनी मानवतेचा परत एकदा परिचय करून देत कंकडालवार यांनी मात्र आपल्या मदतीचे कार्य निरंतर सुरूच ठेवले…हे विशेष.
कु.रोशनी हिचा डोळ्याची ऑफरेशन यशस्वी झाल्याने आता तिला दोन्ही डोळे पूर्णपणे दिसायला लागले.रोशनी काल दवाखान्यातुण घरी आल्याने आज आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजय कंकडालवार यांच्या अहेरी जनसंपर्क कार्यालय येथे कंकडालवार यांची भेट घेऊन अजयभाऊंचे आभार मानले.
यावेळी प्रमोद आत्राम माजी सरपंच, अज्जू पठाण माजी सरपंच आलापल्ली,कार्तिक तोगम माजी उपसरपंच,प्रमोद गोडसेलवार,प्रकाश दुर्गेसह काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.