अहेरी : आज अहेरी येथील बस स्थानकात इंग्रजाविरुध्द स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या स्वातंत्र्य वीर बाबूराव फुलेश्वर शेडमाके यांच्या आज जयंती निमित्त औचित्य साधून अहेरी येथील महापरिवहन विभागाकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आली होती.सदर कार्यक्रमाला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी उपस्थित राहून अभिवादन केले.तसेच त्यावेळी अजय कंकडालवार यांचा ढोल तशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.
१८५७ चे स्वातंत्र्यवीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके ज्यांनी चंद्रपुर- गडचिरोली भागातील सावकार तथा इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता.गडचिरोली व चंद्रपुर येथील गोंड तथा इतर गैर गोंडियन समाजास सावकारांच्या जाचातून त्यांच्या हूकूमशाही व अत्याचारातून सुटका करून देण्या करिता वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्यांनी प्रत्येक समाजातील तरून युवकांना सोबत घेऊन जंगोम सेना तयार केली व सावकार आणी इंग्रजांच्या विरूद्ध लढाई सुरू केली. बाबुरावांना व जंगोम सेनेला भरपुर यश मिळाले होते.
तसेच क्रातीविर बाबुराव पूल्लेश्वर शेडमाके यांच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून अहेरी बस आगारात आपले सेवा पूर्ण केलेले मा.प्रकाश भोंगरे वाहतूक निरीक्षक,मा.विश्वनाथ शेडमाके चालक,मा.माणिक वरखडे यांत्रिक यांना आज शाल श्रीपळ भेट वस्तू देऊन थाटात निरोप समारंभाचा आयोजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ.मोरे मॅडम स.पो.नि.अहेरी,किशोर जगय्या गट्टूवार,सुरज तिवारी,माणिकराव वरखंडे,सूर्यकांत मोरे,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक न.प.अहेरी,नरेंद्र गर्गम,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,सतीश कुमरे,दीपक कोरेत,गणेश चांदेकर,उमेश चांदेकर,व्ही.डी. गेडाम,उमेश सिडाम,प्रमोद गोडसेलवार गावखेड्यातील नागरिक,प्रवासी उपस्थित होते.
Home अहेरी अहेरी येथे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांना अभिवादन : माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार...