अहेरी : आज अहेरी नगरपंचायत हद्दीतील गडअहेरी येथील इंग्रजाविरुध्द स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या स्वातंत्र्य वीर बाबूराव शेडमाके यांच्या आज जयंती औचित्य साधून गडअहेरी येथील आदिवासी समाज बांधवांकडून तसेच समस्त नागरिकांकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आली होती.सदर कार्यक्रमाला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून अभिवादन केले.
यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,बिरजू गेडाम,नामदेव सिडम,रुपेश मेश्राम,पुष्पा मेश्राम,रसिक आत्राम,सुशील आत्राम,विष्णू तोर्रे,विमला आत्राम,सुरज आत्राम,रुपेश आत्राम,अनुसया इस्टाम,अश्विन आत्राम,प्रियंका इस्टाम,वर्षा दुर्गेसह परिसरातील आदिवासी बांधव तसेच गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home अहेरी गडअहेरी येथे क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांना अभिवादन : काँग्रेसनेते अजय कंकडालवार यांचा...





