अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील आज हनुमान जन्मोत्सव निमित्त आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रा समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार आणि काँग्रेस नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सोनालीताई कंकडालवार दाम्पत्यानी हनुमान मंदिरात पवनसुता हनुमान यांचे दर्शन घेऊन पूजा अर्चना केले आहे.तसेच मंदिर ठिकाणी महाप्रसाद कार्यक्रमाही कंकडालवार परिवाराकडून आयोजित केले आहे.परिसरातील व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसाद आस्वाद घेतले.
त्यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील समस्त जनतेला सुख शांती समृद्धी लाभोयसाठी बजरंगबाली ला प्रार्थना केली.येथील हनुमान मंदिरात भक्तजनाच्या उपस्थितीत जन्मोत्सव कार्यक्रम मोठया थाटात पार पडला.
यावेळी मातोश्री मंदाबाई रामय्याजी कंकडालवार,इंदाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच वैभव कंकडालवार,स्मिता वैभव कंकडालवार,युवराज कंकडालवार,विराज कंकडालवार स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.