सिरोंचा : नगर पंचायतचे उपध्यक्ष बबलू पाशा यांचेसह नगरसेवकांनी काल 19 जून रोजी आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा निरीक्षक व माजी जिप.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या अहेरी येथील जनसंपर्क कार्यालय येते भेट घेतले.या भेटीदरम्यान सिरोंचा शहर विकासत्मक बाबीवर चर्चा केली.याभेटीमध्ये नगरपंचायत उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी नगरपंचायत हद्दीत सुरु असलेल्या विकासत्मक कामाची माहिती दिली.
तसेच भविष्यात आयोजित विविध विकासत्मक कामाबाबत चर्चा केली.विशेष म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकी बद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली.असून सिरोंचा तालुक्यात विधानसभा निवडणुकीबद्दल रणनीती तयार करण्याबाबत या दरम्यान सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी नपं उपध्यक्ष बबलू पाशा,नगरसेवक नरेश अलोणे, स्वीकृत नगरसेवक राजेश बंदेला,मारोती गणपूरपूसह सिरोंचा शहरातील प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.