अहेरी टुडे न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी ( Aheri )
भामरागड तालुक्यातील येचली येथील अवैध रेतीसाठा प्रकरणी संबंधित दोषी महसूल विभागाच्या अधिका-यांसह कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, या मागणीला घेऊन सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी 14 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण छेडण्याच्या इशारा दिला होता.मात्र काही कारणास्तव आंदोलन स्थळात बदल करण्यात आला असून सदर आंदोलन आता अहेरी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.येचली रेतीसाठा प्रकरणी अनेकदा तक्रारी करुनही कोणतीही कारवाई न झाल्याने संतोष ताटीकोंडावार यांनी विविध मागण्यांना घेऊन 14 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा दिला होता. मात्र काही कारणास्तर सदर आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय ऐवजी अहेरी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी दिली आहे. यासंदर्भाचे निवेदन तहसिलदारांमार्फत जिल्हाधिका-यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.