Home आलापल्ली आदिवासी मुलींवर अत्याचार सहन करणार नाही – आरोपींवर कठोर कारवाई करा :भ्रष्टाचार...

आदिवासी मुलींवर अत्याचार सहन करणार नाही – आरोपींवर कठोर कारवाई करा :भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांची मागणी

212
0

अहेरी टुडे न्युज नेटवर्क / आलापल्ली शहर प्रतिनिधी ( Allapalli )

एटापल्ली तालुक्यातील आदिवासी अल्पवयीन मुलीवर आलापल्ली येथे झालेल्या बलात्कार प्रकरणाचा तपास करुन आरोपींवर कठोर कार्यवाही करून फाशीची सजा देण्यात यावे अशी मागणी भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी प्रसिद्ध पत्रकात केली आहे.भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार वतीने जिल्हा प्रसिद्ध पत्रकात संतोष ताटीकोंडावार यांनी म्हटले आहे की, आलापल्लीत आदिवासी मुलींवर बलात्कार प्रकरणात सहभागी आरोपी हे धार्मीक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या संघटनेशी संबंधीत असल्याचे बोलल्या जात असल्याने आरोपींवर बलात्कार,बाल लैंगिक शोषण कायद्यासह ॲक्ट्रोसिटी एक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत.तसेच या निषेधार्ह प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग आहे काय? याचाही तपास करावा,अशीही मागणी भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here