Home राजकीय अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध ठिकाणी कॉर्नर सभा आयोजित

अहेरी विधानसभा क्षेत्रातील विविध ठिकाणी कॉर्नर सभा आयोजित

51
0

अहेरी : गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया / महाविकास आघाडीचे उमदेवार डाॅ.नामदेवराव किरसान यांच्या  प्रचारासाठी माजी कॅबिनेट मंत्री तथा विरोधी पक्षा नेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज अहेरी विधानसभा क्षेत्रातील छाल्लेवाडा,गोंड मोल्हा,भिमारगुडमसह इतर गावातील विविध ठिकाणी कॉर्नर सभा घेण्यात आली आहे.

दरम्यान कॉर्नर सभेला उपस्थित मतदारांना महत्वाच्या विविध समस्या विचारात घेऊन येत्या १९ तरीखेला होणाऱ्या गडचिरोली – चिमूर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेते तथा कांग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांच्या दुसऱ्या क्रमांकवर आसलेल्या पंजा या चिन्ह समोर बटण दाबून प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी गावोगावी घरोघरी आपण सर्व प्रचार करावे.आणि मतदान करण्याचे आव्हान काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी जि.प.सदस्य सुनीत कूसनाके,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगर पंचायत अहेरी ,भास्कर तलांडे माजी सभापती अहेरी,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,सचिन पांचार्यासह गावातील नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here