अहेरी टुडे न्युज नेटवर्क / अहेरी तालुका प्रतिनिधी ( Aheri )
अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत वेलगुर अंतर्गत येणाऱ्या येलचिल येथील सरपंच किशोर आत्राम यांचे वडील स्व.दोगे चुक्कु आत्राम यांचा निधन झाले होते.आज तेरवी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमाला अविसंचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून आत्राम कुटुंबाचा सांत्वन केले.
यावेळी उपस्थित अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,संतोष वसाके,पुणेश कंदीकुरवार,शाम ओंडरे,राजू मडावी,साईनाथ नागोसे,नरेंद्र गर्गम,विनोद रामटेके,राकेश सडमेक,प्रकाश दुर्गेसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थित होते.