Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बांधकामाचे...

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बांधकामाचे भूमिपूजन

4
0

अहेरी : तालुक्यातील जामगाव येथील जिल्हा परिषद शाळेजवळील चौकात हिंदवी स्वराज्य संस्थेचे संस्थापक व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविणार असून याचे भूमिपूजन काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजय कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी या दोघांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी जामगांव येथे शिवाजी महाराजांचा पुतळ्या उभारण्यात यावी म्हणून जामगांव येथील समस्त नागरिकांनी काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांच्याकडे अनेकदा मागणी केले होते.जामगाव येथील नागरिकांच्या मागणीला दाद देत अजयभाऊ कांकडलवार यांनी स्व:खर्चाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याची ग्रामस्थांना आश्वासन दिले होते.

ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनानुसार  शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे बांधकामाचे भूमिपूजन केले.महापुरुषांच्या पुतळे बसविण्यासाठी शासन कडून निधी उपलब्ध न झाल्याने शेवटी काँग्रेसनेते अजय कंकडालवार यांनी पुढाकार घेत स्व:खर्चाने पुतळा बांधकाम सामोरे आले.अजयभाऊ कंकडलवार यांचे या कामाप्रती येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त आश्वासन पूर्ती केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

यावेळी माजी उपसरपंच अशोक येलमुले,वांगेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप मडावी,ग्रामपंचायत सदस्य वंदना दुर्गे,माजी जि.प.सदस्य सुनीता कूसनाके,ग्रामपंचायत सदस्य राजू दुर्गे,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,ग्रामपंचायत सदस्य गर्गमताई,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,ओमकार पोट्टे,व्यंकटेश धानोरकर,अरविंद निखाडे,सुरेश आत्राम,हनुमंतू डोके,शंकर आर डोके,मधुकर सांमरे,सदाशिव धानोरकर,श्रीनिवास डोके,अशोक जुनघरे,प्रवीण पिपरे,शुभम धानोरकर,राकेश ठोंबरे,राजेश ठोंबरे,श्रावण पोटे,विनोद डोके,सत्यनारायण सामरे,सुनील चापले,राहुल निखाडे,आनंदराव धानोरकर,अक्षय पोटे,चंपत चौधरीसह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here