Home अहेरी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर खेळालाही महत्त्व द्यावे : कंकडालवार

विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर खेळालाही महत्त्व द्यावे : कंकडालवार

14
0

अहेरी : इंदाराम येथे शुक्रवार १३ डिसेंबर २०२४ रोजी केंद्रस्तरीय शालेय बालक्रीडा तथा सांस्कृतिक संमेलनाची आयोजन करण्यात आली आहे.या केंद्रस्तरीय शालेय बालक्रीडा तथा सांस्कृतिक संमेलनाचा उद्घाटन माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.

              पुढे बोलतांना विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर खेळालाही महत्त्व द्यावे.दैनंदिन जीवनात अभ्यासासोबत काही वेळ खेळालाही द्यावा आणि आपल्यातील सुप्त कौशल्य विकसित करावे.केंद्रस्तरीय क्रीडा संमेलनातून उत्कृष्ट खेळाडू घडवावे.

                    इंदाराम केंद्रस्तरीय शालेय बाल क्रीडा तथा सांस्कृतिक कला संमेलनाचे उदघाटन प्रसंगी आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रा समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी मार्गदर्शन करीत होते.

                 अजय कंकडालवार आगमन होतच लेझीम विविध नृत्याने सादर करत स्वागत करण्यात आले.दरम्यान माजी जि.प. अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना,दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

                यावेळी वर्षाताई पेंदाम सरपंच इंदाराम,माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,इंदाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच वैभव कंकडालवार,वांगेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप मडावी,ग्रामपंचायत सदस्य मडावीताई,माजी सरपंच नामदेव आत्राम,पोलीस पाटील सदाशिव दुर्गे,इंदाराम शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष प्रकाश पेंदाम,मोदुमतूर्रा शाळा व्यवस्थापक  समिती अध्यक्ष पोशाल्लू कांबळे,भगवंतराव हायस्कूलचे मुख्याध्यापक ममीडालवार सर,केंद्र प्रमुख पुल्लुरवार सर,केंद्र प्रमुख पुसालवार सर,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे उपसरपंच कार्तिक तोगम,विनोद रामटेके,प्रल्हाद पेंदाम,लालु दुर्गे,बाबुराव पानेम,प्रमोद गोडसेलवार,लक्ष्मण आत्रामसह आदी मान्यवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here