Home सिरोंचा माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

71
0

सिरोंचा : तालुक्यातील टेकडातल्ला येथील विश्वात्मा क्रिकेट क्लब टेकडा तल्ला येथील भव्य टेनिस बॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजित केली आहे.या सदर क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आविसं – काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.

या क्रिकेट कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंनू जी.मडावी होते.सहउदघाटक म्हणून आविसं तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम आणि काँग्रेस तालुका अध्यक्ष सतीश जावजी होते.प्रमुख पाहुणे म्हणून जाफ्राबाद ग्रामपंचायतचे सरपंच निर्मलाताई कुळमेथे आणि महिला काँग्रेस उपअध्यक्ष नीताताई तलांडे होते.

या क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.द्वितीय पारितोषिक बानय्या जनगाम – काँग्रेस तालुका अध्यक्ष सतीश जवजी देण्यात येत आहे.तृतीय पारीतोषिक माजी उपसरपंच तिरुपती दुर्गम – ग्रामपंचायत सदस्य तिरुमाला दुर्गम देण्यात येत आहे.

सर्व प्रथम अजयभाऊ कंकडालवार यांनी गौतम बुद्ध आणी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी गावात आगमन होतच गावकर्यांनी विविध नूत्या करत ढोल तशाने जंगी स्वागत केली आहे.

यावेळी उपस्थित आविसंचे जेष्ठ नेते शंकर मंदा,आविसं नेते मल्लिकार्जुन आकुला,सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम,महिला उपाध्यक्ष नीताताई तलांडे,रामूलू कुळमेथे,बीचमाय्या कुळमेथे,सरपंच निर्मला कुळमेथे,माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,विद्यमान सदस्य गुलाबराव सोयाम,सरपंच दिलीप मडावी,वेलगुर ग्रामपंचायतचे माजी सरपंच अशोक येलमुले,मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,माजी उपसरपंच तिरुपती दुर्गम,ग्रामपंचायत सदस्य महेश दुर्गम,मारोती गणपूरवार,सरपंच तथा सिरोंचा बाजार समिती संचालक अजय आत्राम,लक्ष्मण बोल्ले,साई मंदा,श्रीनू गोडाम,माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या सोशल मीडिया समन्वयक संपत गोगूला,जेनु अंबाला,संतोष कोयला,संतोष अडुरी,राजशेखर दुर्गम,महेश दुर्गम,आनंदराव आशा, किशोर चिट्याला,कैलाश कोयला,सडवली दुर्गम,स्वप्नील मडावी,शिवराम पुल्लूरी,नरेश गर्गम,प्रमोद गोडसेलवार,अशोक चिपेल्लीसह परिसरातील आविसं – काँग्रेसचे पदाधिकारी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here