Home अहेरी एटापल्ली तालुक्यातील पंधरा गावातील नागरिकांनी गाठले जिल्हाधिकारी कार्यालय…जिल्हाधिकाऱ्यांना विविध ज्वलंत समस्यांचे निवेदन...

एटापल्ली तालुक्यातील पंधरा गावातील नागरिकांनी गाठले जिल्हाधिकारी कार्यालय…जिल्हाधिकाऱ्यांना विविध ज्वलंत समस्यांचे निवेदन सादर

1
0

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील तब्बल पंधरा गावाचे नागरिक व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून त्यांना विविध ज्वलंत समस्यांचे निवेदन सादर केले.

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड,पुरसलगोंदी,गट्टा,वाघेझारी, कोइंडूल, चोकेवाडा, रेकणार, गुमली,कन्हाळगाव, मेंढरी, कारका, असावंडी आदी गावातील नागरिक व कार्यकर्त्यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांना भेटून निवेदन सादर करून गावातील विविध समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.

गावकरी व कार्यकर्त्यांनी  जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात गेदा,उडेरा, कांदोळी, घोटसुर,पुरसलगोंदी, गट्टा, वांगेतूरी व गर्देवाडा येथे धान्य गोदाम बांधकाम करणे,चोकेवाडा,कोईड्युल,गडद्दापल्ली, रेकेणार, गुमली,वेडमपायली, कान्हाळगाव व मेंढरी या गावांमध्ये मुख्य व अंतर्गत रस्त्यांची खडीकरण व डांबरीकरण रस्त्यांची काम करणे तसेच चोकेवाडा ते कोईडूल येथे मोठ्या पुलांचे बांधकाम करण्यात यावी.आणि सुरजागड, हेद्री, गट्टा व कोठी या रस्त्याचे नव्याने नूतनीकरण व डांबरीकरण करणे,आदी महत्वपूर्ण समस्यांच्या समावेश आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतांना टिडीसीचे संचालक सैनूजी गोटा,काँग्रेस नेते प्रज्वलभाऊ नागूलवार, रमेश वैरागडे, सुधाकर गोटा,लालसू नरोटे,रामा नैताम, हरिदास मठामी,सोमजी गावडे, कपिल मठामी, संदीप वैरागडे, सत्यवान रापंजी, राकेश मठामी, नानीश पोई आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनातील प्रत्येक समस्या प्रामुख्याने सोडविण्याची शिष्टमंडळाला आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here