Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांची आत्राम कुटुंबियांना...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांची आत्राम कुटुंबियांना उपचारासाठी आर्थिक मदत

45
0

अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली येथील रहिवासी सुरेश आत्राम यांचा मुलगा श्रीनिवास आत्राम यांची काही दिवसांपासून प्रकृती ठिक नाही. पण आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने दवाखान्यात नेऊन उपचार करण्याची सोय नव्हती. वांगेपल्लीचे सरपंच दिलीप मडावी यांनी आविसं, काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या अहेरी जनसंपर्क कार्यालयात श्रीनिवासच्या आई वडीलांना घेऊन.

ही अडचण सांगितली.सुरेश आत्राम यांच्या मुलगाला वेळीच उपचार मिळावे यासाठी अजयभाऊ यांनी कोणताही विलंब न करता आत्राम कुटुंबियांना औषधोपचारासाठी आर्थिक मदत केली. औषधोपचारासाठी आणखी अडचण भासल्यास मला कळवा असा धीर त्यांनी कुटुंबीयांना दिला. त्यामुळे आत्राम कुटुंबियांनी अजयभाऊंचे आभार मानले.

यावेळी वांगेपल्लीचे सरपंच दिलीप मडावी, उपसरपंच राजेश कोटपल्लीसर, तसेच गोपाल सिडाम, मरपल्लीचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, प्रमोद गोडसेलवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here