सिरोंचा : नगरपंचायतच्या वतीने बतकम्मा देवी मूर्तीचे भूमिपूजन विठ्ठलेश्वर मदिर प्रांगणात नगरपंचायतचे उपाध्यक्ष मा.श्री.बबलू पाशा यांचा हस्ते भूमिपूजन करण्यात आली आहे.नगरपंचायततील सरकार आल्या लगेच स्मशान भूमीचे भूमिपूजन त्यानंतर बतक्काम्मा देवी मूर्तीचे भूमिपूजन करण्यात आली आहे.विशेष म्हणजे अहेरी विधानसभा क्षेत्रातील आता पर्यंत बतक्काम्मा मूर्ती कुठेही उभारण्यात आले नाही.मात्र सिरोंचा वासियांचा मागणी नुसार बबलूभैया यांनी पाहिलांदा सिरोंचा शहरात बतक्काम्मा मूर्ती उभारण्यात येत आहे.बबलूभैया यांनी नागरिकांना दिले शब्द पूर्ण केल्याने सिरोंचातील समस्त नागरिकांनी नगरपंचायतचे उपाध्यक्ष बबलूभाई पाशा यांना आभार मानले आहे.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बतकम्मा देवीला समर्पित या मूर्तीची उभारणी होत असल्यामुळे भक्तगणांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले आहे.दरवर्षी नवरात्री उत्सव मोठ्या थाटात संपन्न होतात.दरम्यान या बतकम्मा देवीच्या उत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन केले जाते.या उत्सवात मोठ्या संख्येने भक्तगण भाग घेत असतात यामधे मुख्यत्त महिला भक्तांची संख्या मोठया प्रमाणात असते.या मूर्तीच्या निमित्ताने सिरोंचा शहराची शोभा आणखी वाढणार आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगर उपाध्यक्ष नगर पंचायत सिरोंचा बबलू पाशा,मुख्याधिकारी जनक काडबाजीवार,काँग्रेस तालुकाध्यक्ष सतीश जवाजी,सभापती इम्तियाज खान,नगरसेवक राजेश बंदेला,पुरोहित रमण सर,मारुती गणपूरपू,ज्येष्ठ नागरिक के.ब्रह्मानंद,शंकर बुधावार,सुभाष व्यास,दामोदर मार्गोणी,नागेश दुग्यला,शंकर मारगोनी,येल्पूला वेंकटेश,पानेम राजू,सतीश येगोलपु,नपा कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.