Home अहेरी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून कॅन्सरग्रस्त महिलेला उपचारासाठी आर्थिक मदत

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून कॅन्सरग्रस्त महिलेला उपचारासाठी आर्थिक मदत

20
0

अहेरी : तालुक्यातील वेलगूर येथील श्रीमती.गीता पंदीलवार काही दिवसांपासून कॅन्सर झालेल आहेत.काल काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांनी वेलगूर दौऱ्यावर घेले होते.दरम्यान गावातील नागरिक व कार्यकर्त्यांकडून माहिती देताच कंकडालवार यांनी कॉन्सर ग्रस्त महिलेची निवास्थानी भेट घेऊन त्यांची तब्येत बाबत जाणून घेतले.

पंदीलवार परिवार अंत्यत गरीब असून त्यांना उपचार घेण्यासाठी अडचण बसल्याची माहिती सांगितले होते.काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्र समन्वयक व माजी जि.प अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी कॅन्सरग्रस्त रुग्ण श्रीमती.गीता पंदीलवार यांना औषधोपचार करण्याकरिता आर्थिक मदत करण्यात आली.त्यावेळी अजयभाऊंनी सांगितली की पुढील कोणत्याही समस्या असो मला सांगा मदत करण्यासाठी मी तयार आहो असे गावातील नागरिकांना व रुग्णना सांगितले.

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती गीता चालूरकर, अहेरी नगर पंचायत नगर सेवक प्रशांत भाऊ गोड्सेलवार, मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,ग्रामपंचायत सदस्य रोहित गलबले,शंकर झाडे,ताशूभैया,सलीमभैया, प्रमोद गोड्सेलवार, महेश रेशेसह स्थानिक कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here