अहेरी : आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर जिमलगट्टा परिसरातील विविध पक्षाचे पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे.दरम्यान त्या परिसरातील युवा वर्गानी काँग्रेस पक्षात येण्यासाठी आणि अजय कंकडालवार यांचा नेतृत्वात काम करण्यासाठी अनेकांनी उत्सुकता दाखवत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर पक्षाप्रवेश केले आहे.
त्यात पवन मेडी,संजय बटलावर,संदीप चंदावार,चंदू कुसराम,सहदेव सडमेक, आदेश यादव,मल्लेश गज्जाला अन्य गावातील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.काँग्रेसचे दुप्पटे टाकून अजय कंकडालवार यांनी काँग्रेस पक्षात स्वागत केले.
विशेष म्हणजे एका जिमलगट्टा नसून अहेरी मतदारसंघतील सगळीकडे पक्षप्रवेश मालिका सुरू असल्याने अहेरी विधानसभा क्षेत्रत काँग्रेस पार्टी नव्याने उभारी घेत आहे.त्यामुळे होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने अजय कंकडालवार यांचा विजय होईल, असा विश्वास काँग्रेस पक्षातुन व्यक्त केला जात आहे.
सदर पक्षप्रवेश अहेरी अजय कंकडालवार यांचा जनसंपर्क कार्यालय येथे घेण्यात आली आहे.यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी सभापती सुरेखा आलम,माजी उपसरपंच कार्तिक तोगम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार यांच्यासह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Home अहेरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात इनकमिंग सुरूच,जिमागट्टातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांची प्रवेश…माजी जि.प.अध्यक्ष अजय...





