अहेरी : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या.नाशिक संचालक मंडळ निवडणुकीत अहेरीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना जोरदार धक्का लागले असून यात काँग्रेसचे अजयभाऊ कंकडालवार पुरस्कृत पॅनलने मुसंडी मारली आहे.
विशेष म्हणजे या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आमदार आत्राम यांचे सख्या भावाला पराभवाला सामोरे जावं लागले आहे. काँग्रेसचे कंकडालवार पुरस्कृत उमेदवाराने त्यांच्या पराभव केल्याने अहेरीच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेलं आहे.
अगदी शेवटपर्यंत चूरशीचे ठरलेल्या या निवडणुकीत काँग्रेसचे कंकडालवार यांच्या पॅनलने मुसंडी मारत अहेरीचे आमदार आत्राम यांच्या पॅनलला जबर धक्का दिलेलं आहे.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसमोर काँग्रेसचे अजय कंकडालवार यांनी संचालक मंडळ निवडणुकीत आपल्या समर्थकांना मोठ्या मतांचा फरकाने निवडून आणत अहेरीचे आमदार आत्राम यांना एकप्रकारे राजकीय आव्हान दिल्याचे क्षेत्रातील राजकीय जाणकार बोलू लागलयं.
Home मुख्य बातम्या संचालक मंडळ निवडूकीत काँग्रेसचे अजयभाऊ कंकडालवार पुरस्कृत पॅनलची वर्चस्व..अहेरीचे आमदार आत्राम यांना...





