Home मुख्य बातम्या जिल्हा परिषदे अंतर्गत मंजूर असलेली बोअरवेल नागेपल्ली ग्रामपंचायत सदस्याच्या खाजगी शेतात ‘प्रशासन...

जिल्हा परिषदे अंतर्गत मंजूर असलेली बोअरवेल नागेपल्ली ग्रामपंचायत सदस्याच्या खाजगी शेतात ‘प्रशासन अनभिज्ञ

13
0

अहेरी : गडचिरोली जिल्हापरिषद पाणी पुरवठा विभागा अंतर्गत गाव निहाय ज्या ठिकाणी खरोखर गावकऱ्यांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत असेल पाण्याची टंचाई असेल अश्या भागात जिल्हापरिषदेच्या निधी अंतर्गत बोअरवेल मंजूर करण्यात आले आहे.आणि ती बोअरवेल गावनिहाय देत असताना नागेपल्ली ग्रामपंचायत सदस्यानी चक्क ती बोअरवेल आपल्या खाजगी शेतात मारल्याचे उघडकीस आले आहे.

त्यामुळे जनतेला पाण्यासाठी भटकंती थांबणे रोखण्याऐवजी स्वतःचा फायदा कसा होईल असा हा प्रकार आहे.जिल्हा परिषद अंतर्गत पाणी टंचाईग्रस्त गावांसाठी बोरवेल मंजूर असल्याने होळी च्या आधी रात्रौ च्या सुमारास बोरवेल ची गाडी पुसुकपल्ली गावात बोरवेल खोदण्यासाठी आली.रात्रीची वेळ असल्याने याची माहिती गावातील लोकांना नव्हती.मात्र, पुसुकपल्ली येथील ग्रामपंचायत सदस्य राकेश कुलमेथे यांना याची कल्पना होती.

त्यामुळे त्यांनी बोअरवेल वाल्यासोबत संगनमत करून आपल्या शेतात बोअरवेल खोदण्यास सांगितले.याची कुणकुण गावकऱ्यांना लागताच त्यांनी या संदर्भात संबंधित ग्रामपंचायत सदस्य कुलमेथे यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

पाणी टंचाई असलेल्या ठिकाणी बोअरवेल न मारता स्वतःच्या खाजगी शेतात बोअरवेल मारल्याने संतप्त गावकऱ्यांनी याची तक्रार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांना माहिती दिली असता माहिती मिळताच वेळेचं विलंब न करता माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार हे तात्काळ ते गावा गाठले आणि गावकऱ्याकडून करण्यात आलेल्या तक्रारीची दखल घेत ग्रामपंचायत सदस्य राकेश कुळमेथे यांनी केलेल्या कृत्याच त्यांनी लगेच मोका स्थळी पोहचून मोका स्थळाची पाहाणी केली.आणि सदर विभागाकडे कारवाईची मागणी केली.

यावेळी माजी जिल्हापरिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी याची दखल घेत त्या सदस्यास विचारपूस केले असता त्यांनी नकार देत मी स्वतःच्या शेतात खाजगी बोअरवेल मारत असल्याचा ग्रामपंचायत सदस्य राकेश कुळमेथे हे बोलत होते.आणि गावकरी त्याचा विरोध करत हा बोअरवेल जिल्हापरिषद निधी अंतर्गत मंजूर असल्याचे बोलत होते.आणि या सदस्यविरुद्ध कारवाईची मागणी माजी जिल्हापरिषद अध्यक्ष यांच्या कडे केली आहे.

यासंदर्भात संबंधित ग्रामपंचायत सचिव लोमेश वाळके यांना विचारणा केली असता जिल्हा परिषद अंतर्गत पाणी टंचाईग्रस्त गावातील बोअरवेल मंजूर आहे.मात्र नेमक कुठे बोअरवेल खोदायची याची गफलत झाली आहे. त्यामुळे हा प्रकार घडल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here