अहेरी : तालुक्यातील वेलगूर येथे 16 नोव्हेंबर 2025 रोजी रविवारी पारंपरिक सांस्कृतिक वारसा जपत विविध सामाजिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले.मुठवा पहांदीपारी कुपार लिंगो तथा विर बाबुराव सडमेक सल्ला गांगर शक्ती स्थापना, साप्तारंगी ध्वजारोहण,सामूहिक विवाह सोहळा तसेच सामाजिक-सांस्कृतिक कोया पुनेम संमेलन अशा उपक्रमांनी संपूर्ण परिसर उत्साहाने न्हाऊन निघाला.
कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व विद्यमान संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केले.त्यांच्या उपस्थितीमुळे आयोजक, ग्रामस्थ आणि पाहुण्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
ग्रामस्तरावरील एकोप्याला आणि परंपरांना बळकटी देणारे असे कार्यक्रम वार्षिक उत्सवाच्या रुपाने गावात रंगतदार पार पडले.





