अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत महागाव ( खुर्द )अंतर्गत येत असलेल्या मुत्तापुर येथील सर्व रहिवासी गावकऱ्यांनी लोकवर्गणीतुन समाज भवन बांधकाम करण्यासाठी ग्रामपंचायतला जागा उपलब्ध करुन देण्यासाठी विचारणा केली असता.
ग्रामपंचायतने आम्हाला खुली आबादी जागेवर बांधकाम करण्यास सांगीतले त्यानुसार गावकऱ्यांनी गाव सभा घेऊन जमिन साफ सफाई करण्याचे ठरविले व मा.तहसिलदार साहेब अहेरी यांच्या कार्यालयात परवानगीसाठी अर्ज सादर केला आहे.
परंतु दुसऱ्या दिवशी श्री.ललित कारेंगुलवार यांनी माझी प्रापर्टी म्हणुन अनाधिकृतपणे अतिक्रमण केला आहे.त्या अनुषंगाने आम्ही गावकऱ्यांनी ग्रामपंचायतला जाऊन चौकशी केली असता सदर आबादी जागेवर श्री ईश्वर पोच्या नाईनवार यांच्या नावाने नमुना आठ ला 2015 = 300 स्के.फुट झोपडी घराचे कर आकारणी केल्याचे दिसुन आले.
सदर व्यक्ती हा 30-35 वर्षापुर्वी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी गाव सोडुन दुसऱ्या गावात स्थलांतरीत झाला असुन ती जागा खुली आहे परंतु त्यांनी 2023 ला स्टॅम्प पेपरवर नोटरी करुन श्री ललित करेंगुलवार व श्री. संजिव गुंपला (सामाईक ) यांच्या नावाने विक्रि केल्याचे दस्ताऐवज आढळले.
सदर व्यवहार करतांना ग्रामपंचायत कमिटीला व गावकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर व्यवहार केला असुन श्री कारेंगुलवार व श्री. गुंपला त्यानी भुमी अभिलेख कार्यालयातील मोजणी कर्मचारी श्री.समय्या बोम्मनवार यांच्याशी संगनमत करुन खोटी दस्तऐवज तयार करुन प्रापर्टी कार्ड बनविले.
महत्वाची बाब म्हणजे स्टॅम्प पेपरवर साक्षीदार म्हणुन गावकऱ्यांची स्वाक्षरी नसुन एक शिक्षक श्री.धनराज दुर्गे व भुमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी श्री समय्या बोम्मनवार यांची स्वाक्षरी आहे.
करिता श्री कारेंगुलवार व श्री.गुंपला यांच्या नावाची गृहकर पाणी कर आकारणी रद्द करण्यात यावे तसेच प्रापर्टी कार्ड आणि अनधिकृतपणे असलेली अतिक्रमण हटविण्यात यावी व दोषी लोकांवर कडक कार्यवाही करण्यात यावी.
अन्यथा गावकर्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांचा नेतृत्वाखाली येत्या 7 दिवशाच्या नंतर तहसील कार्यालयासमोर आमरण
उपोषणाला बसण्यात येईल.
अशी समस्त गावकर्यांनी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचा नेतृत्वाखाली तहसीलदार अहेरी यांना निवेदन देण्यात आली आहे.
Home मुख्य बातम्या मुत्तापूर येथील आबादी जागेवरील अनधिकृत अतिक्रमण हटवा….अजय कंकडालवार यांचा नेतृत्वाखाली अहेरी तहसीलदार...





