अहेरी टुडे न्युज नेटवर्क / एटापल्ली तालुका प्रतिनिधी ( Etapalli )
एटापल्ली तालुक्यातील तोडस ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांचे ग्रामकोष समितीच्या खात्यात तेंदूपत्ता ( राॅलल्टी ) बोनास रक्कम व पेसा 5% अबंध निधी जवळपास 35 ते 40 लक्ष रुपये ग्रामकोष समितीच्या खात्यात जाम झाले. परंतु संबंधित तेंदूपत्ता खातेदाराला ज्या वेळेस आम्ही चेक दिले त्यावेळेस खात्यामध्ये पैसे नाही असे सांगितले त्यावेळेस सर्व गावांचे ग्रामकोष समितीचे खाते चेक केले असता आम्हाला असे आढळून आले कि, आमच्या नावाने बनावट स्वक्षऱ्या करून सचिव / सरपंच व रुपेश दहागावकर यांच्या संयुक्त संघनमताने सदर रक्कम अफरातफर केले आहेत. ही रक्कम तोडस ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील जनतेची आहे.या करिता सदर प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई व फौजदारी गुन्हा दाखल करून तोडसा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या एकूण 10 गावांतील जनतेला व ग्रामकोष समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना हक्क व न्याय मिळवून देण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली.