अहेरी : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील किष्टापूर वेल ग्रामपंचायतीत एक महत्त्वपूर्ण घटनाक्रम घडला आहे. ग्रामपंचायतीचे सदस्यांनी सरपंच श्री.नंदू डोलू तेलामी व उपसरपंच पवन दिवाकर यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.हा प्रस्ताव मा. तहसीदार साहेब व निवडणूक निर्णय अधिकारी साहेब,तहसील कार्यालय अहेरी यांना सादर करण्यात आला आहे.
अविश्वास प्रस्तावाची कारणे
ग्रामपंचायतीचे सदस्यांनी सरपंच नंदू डोलू तेलामी व उपसरपंच पवन दिवाकर यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मांडण्यामागे अनेक गंभीर कारणे आहेत.प्रस्तावात नमूद केल्यानुसार, ग्रामपंचायतीच्या विकासाची कामे करताना सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही.मासिक सभेत घेतलेल्या ठरावांची अमलबजावणी केली जात नाही.आणि ग्रामपंचायतीची कामे पूर्ण झाल्यानंतर ठेकेदारांकडून पैसे घेतल्याशिवाय चेक वर सही मारली जात नाही.
सदस्यांनी आरोप केला आहे की सरपंच नंदू डोलू तेलामी व उपसरपंच पवन दिवाकर आत्राम यांच्यावर त्यांचा विश्वास राहिलेला नाही. हे आरोप खूप गंभीर आहेत आणि ग्रामपंचायतीच्या कार्याच्या पारदर्शकता व विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करतात.
हा अविश्वास प्रस्ताव मा.तहसीदार साहेब व निवडणूक निर्णय अधिकारी साहेब यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. आता या प्रस्तावावर कारवाई करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी या प्रस्तावात नमूद केलेल्या वस्तुस्थितीची पूर्ण माहिती दिली आहे आणि त्यांनी हे आरोप खरे असल्याचे जाहीर केले आहे.
सदर ग्रामपंचायत मध्ये सरपंच रा.कॉ.पक्षचे होते मात्र ग्रामपंचायत सदस्य आविसं,अजयभाऊ मित्र परिवाराचे सदस्य होते.आज आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कांकडालवार व आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष काँगेस हनमंतू मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आली.
यावेळी नरेंद्र मडावी ग्रामपंचायत सदस्य किष्टापूर वेल,मयुरी तलांडे ग्रामपंचायत सदस्य किष्टापूर वेल,दादाराव मडावी ग्रामपंचायत सदस्य किष्टापूर वेल,रसिका सडमेक ग्रामपंचायत सदस्य किष्टापूर वेल,योगिता करपेत ग्रामपंचायत सदस्य किष्टापूर वेल,अनुराधा सरदार ग्रामपंचायत सदस्य किष्टापूर वेल,वनिता सडमेक ग्रामपंचायत सदस्य किष्टापूर वेल,अजय नैताम माजी जि.प.सदस्य, कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,रज्जाक पठाण,गीता चालूरकर माजी उपसभापती अहेरी,स्वप्नील मडावी,हरीभाऊ,पाटील साहेब,सचिन मिसाल प्रमोद गोडसेलवार,बबलू शेखसह आदी उपस्थित होते.आहेत.प्रस्तावात
Home मुख्य बातम्या किष्टापूर वेल ग्रामपंचायतीत सरपंच आणि उप सरपंच विरुद्ध अविश्वास प्रस्ताव: सदस्यांचे गंभीर...