मुलचेरा : तालुक्यातील गोमनीटोला ते श्रीरामपूर बस सेवा बंद आहे.एस.टी.बस सेवा बंद असल्यामुळे नागरिकांना कोणत्याही कामानिमित्त जाण्यासाठी खाजगी वाहन वापरावा लागत आहे.तसेच त्या परिसरातील शाळेचे विध्यार्थ्यांना येण्या – जाण्यासाठी खूप त्रास सहण करावा लागत आहे.लवकरत लवकर एस.टी.बस सेवा सुरु करण्यात यावी अशी गोमनीटोला ते श्रीरामपूर परिसरातील नागरिकांनी मागणी करत आहे.
काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी काल मुलचेरा तालुका दौऱ्यावर असताना अजयभाऊ कंकडालवार यांची एका कार्यक्रमा प्रसंगी गोमणी व श्रीरामपूर ग्रामस्थांनी बसची समस्या बाबत सांगितले होते.
अजयभाऊ कंकडालवार लगेच बस आगारातील प्रमुख अधिकाऱ्यांना दूरध्वनी वरून गोमणी – श्रीरामपूर परिसरातील बस सेवा बंद असल्यामुळे नागरिक व विध्यार्थ्यांचा होत असलेल्या त्रास बाबत सांगितले होते.सांगितल्याने अधिकाऱ्यांनी छानच प्रतिसाद देत उध्या पासून बस चालू करू अशे तोंडी आश्वासन दिल.त्या समस्यांचे आगारातील प्रमुख अधिकाऱ्यांना लक्षत आणून दिल्याने गोमणी – श्रीरामपूर परिसरातील समस्त नागरिक अजयभाऊंची आभार मानले आहे.
यावेळी प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,शुभमभाऊ शेंडे सदस्य ग्रामपंचायत गोमणी,कार्तिक तोगम,विनोद रामटेके,किशोर येलमुले,हरिपद दास,सत्यनारायण गद्दामवार ,सुनील कुसनाके,प्रकाश बरमन,हरिचंद्र मराठे
सुकुमार दास,प्रमोद गोडसेलवार,सचिन पंचार्यसह गोमणी व श्रीरामपूर परिसरातील नागरिक उपस्थित होते,