अहेरी टुडे न्युज नेटवर्क / अहेरी शहर प्रतिनिधी ( Aheri )
अहेरी : योगाच्या माध्यमातून भारताने संपूर्ण जगाला आरोग्याची गुरुकिल्ली दिली आहे. पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीमध्ये केलेल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव दिला होता.त्या वेळी ते म्हणाले होते की, योगविद्या व ध्यानधारणा ही आपल्या भारतीय संस्कृतीकडून अखिल विश्वाला मिळालेली अमूल्य देणगी असून हा अमूल्य ठेवा जोपासणे काळाची गरज आहे. त्यामुळेच आजचा हा दिवस संपूर्ण जगामध्ये जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो.आज आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्त स्व.राजे विश्वेश्वरराव महाराज स्टेडियम (हॉकी ग्राऊंड) अहेरी येथे योगासन करून योग दिन साजरा करण्यात आला.यावेळी योग शिबिराला प्रामुख्याने जेष्ठ नागरिक,शाळेतील विध्यार्थी,भाजपा कार्यकर्ते व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते