मुंबई : माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिवस व संकल्प मेळाव्याचे आयोजन षण्मुखानंद सभागृहात करण्यात आले होते.मेळाव्याला महाराष्ट्र विधानसभाचे विरोधी पक्षनेते व माजी कॅबिनेट मंत्री मा.श्री.ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच काँग्रेसनेते माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यातुन शेकडो काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले आहे.
मेळावा दरम्यान काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी साहेबांनी विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या शासकीय निवास्थानी येथील भेट घेऊन जिल्ह्यातील सुरु असलेल्या राजकीय परिस्थिती बद्दल तसेच विविध समस्या बाबत चर्चा करण्यात आली होती.
भेट दरम्यान जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी – कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.