गडचिरोली : माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त मुंबई येथील होणाऱ्या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधानसभाचे विरोधी पक्षानेते मा.श्री.ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि काँग्रेसनेते माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यातील हजारो काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मुंबई येते रवाना.
दरम्यान कार्यकर्त्यां समवेत शिर्डी मंदिरात जाऊन साई चरणी नतमस्तक होऊन विधिवात पूजा अर्चना साईरामचे दर्शन घेतले आहे.साईचरणी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना केली.
यावेळी जिल्ह्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे समस्त तालुका अध्यक्ष आजी – माजी जिल्हा परिषद सदस्य – पंचायत समिती सभापती उपसभापती,नगरपंचायतचे नगराध्यक्षा,नगरसेवक – आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य गण व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home गडचिरोली माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी शिर्डी येथे साई चरणी नतमस्तक होऊन कार्यकर्त्यांसमवेत...