अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक प्रदीप वसंत श्रीरामवार यांची लिव्हर आणि किडनी पूर्णपणे खराब झाल्याने त्यांच्या उपचारासाठी गडचिरोली जिल्हा रुग्णालय येथे भर्ती करण्यात आली.
प्रदीप श्रीरामवार यांचे किडनी,लिव्हर पूर्णपणे निकामी झाल्याने उपचारादरम्यान त्यांची मूत्यू झालं श्रीरामवार परिवार घरचा परिस्थिती अंत्यत हालखीची असल्याने मृतकांचे मृतदेह स्वागवी आलापल्ली नेण्यासाठी त्यांना आर्थिक अडचण भासत होती.
त्यावेळी बाळू भांगरे आणि अविनाश श्रीरामवार यांनी भ्रमणद्वानी द्वारे आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा माजी जि.प.अध्यक्ष व अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांना कळवतच कंकडालवारांनी मृतदेह आलापल्ली नेण्यासाठी तात्काळ खाजगी वाहन उपलब्ध करून दिले.तसेच पुढील होणाऱ्या कार्यक्रमला आर्थिक मदतही केली.