Home सिरोंचा माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते व्हाॅलीबाॅल...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उद्घाटन

42
0

सिरोंचा : तालुक्यातील गुम्मलकोंडा येथील युथ स्प्रोटिंग क्लब गुम्मलकोंडा ( काँग्रेस तर्फे ) भव्य खुले व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन केली आहे.या व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आली.

या व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.द्वितीय पारितोषिक तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम – काँग्रेस तालुका अध्यक्ष सतीश जावजी देण्यात येत आहे. तृतीय पारितोषिक आसरआल्ली ग्रामपंचायतचे सरपंच रमेश तैनेनी देण्यात येत आहे.

माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी गावात आगमन होतच गावातील नागरिकांनी विविध नूत्या करत ढोल तशाने जंगी स्वागत केली.सर्व प्रथम कंकडालवार यांनी माता सरस्वती – भगवान बिरासा मुंडा – डॉ.बाबासाहेब आंबेडकर – महात्मा फुले – प्रतिमेला पुष्पअर्पण करून अभिवादन केली.

आविसंचे जेष्ठ नेते शंकर मंदा,नेते मल्लिकार्जुन आकुला,सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम,काँग्रेस तालुका अध्यक्ष सतीश जावजी,महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्ष नीता तलांडे,असरआल्ली ग्रामपंचायतचे सरपंच रमेश तैनेनी,सरपंच अजय आत्राम,सरपंच सुरज गावडे,पोलीस पाटील कालिदास गोगूला,गुम्मलकोंडा ग्रामपंचायतचे सरपंच जालमय्या कुरसाम,रोजगार सेवक महेश तलांडे,गर्कपेठा ग्रामपंचायतचे उपसरपंच वेंकटी दसरी,माजी सरपंच जगम पिर्ला,किरण वेमूला,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार प्रशांत गोडसेलवार,माजी उपसरपंच कार्तिक तोगम,मारोती गणपूरवार,माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या सोशल मीडिया समन्वयक संपत गोगूला,नरेश गर्गम,स्वप्नील मडावी,किरण कोंडागुर्ला,लक्ष्मण बोल्ले,सचिन पंचार्यसह आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here