अहेरी : गोंडवाना राज्याच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके आणि वीरांगना राणी दुर्गावती मडावी यांच्या स्मरणार्थ इंदारामच्या विशाल बाबुराव चौकात एक भव्य स्मारक उभारण्यात आले आहे.त्याचे अनावरण सोहळा व सामूहिक विवाह महोत्सव २१ एप्रिल २०२५ रोजी सोमवारीला मोठ्या उत्साहात संपन्न झालं आहे.
या गौरवशाली कार्यक्रमाचे आयोजन वीर बाबुराव शेडमाके गोतुळ समिती व स्मारक निर्माण समिती इंदाराम यांच्या वतीने करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली.
कार्यक्रमाचे रूपरेषा सकाळी ८ वाजता स्मारकाचे अनावरण व महापूजेने (महागोंगू) कार्यक्रमाची सुरुवात झाली.त्यानंतर सकाळी ११ वाजता व्याख्यान व प्रवचन आयोजित करण्यात आली.दुपारी १२.३० वाजता सामूहिक विवाह सोहळा पार पडली.कार्यक्रमाचे सह उदघाटक म्हणून काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार हे होते.अध्यक्ष म्हणून आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी होते.अतिथी म्हणून संदीपभाऊ कोरेत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच या ठिकाणी 26 जोडप्याच्या एकाच मंडपात सामूहिक लग्न सोहळा पार पडला असून यांसाठी नवदाम्पत्यासाठी मंगळसूत्र,डोरले,वधू-वरांना नवे कपड़े,संसारोपयोगी साहित्य व वऱ्हाडीना मिष्टान भोजन काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार यांच्या कडून भेट देण्यात आली आहे.लग्न सोहळ्याला येणारा संपूर्ण खर्च प्रशासनाकडुन नव्हता तर कंकडालवार परिवाराकडुन करण्यात आले.
यावेळी मंचावर मातोश्री मंदाबाई रामय्याजी कंकडालवार,इंदाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच वैभव कंकडालवार,देवलमारी ग्रामपंचायतचे सरपंच हरीश गावडे,अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,प्रज्वल नागूलवार,माजी जि.प.सदस्य सुनीता कुसनाके, स्वप्नील कनमवार,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,प्रकाश दुर्गे,सचिन पंचार्य,प्रमोद गोडसेलवार,सूर्यदेव पेंदामसह परिसरातील व स्थानिक आदिवासी बांधव तसेच स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होती.