Home अहेरी मोसम येथील बाजीराव सडमेक यांचे निधन…अजयभाऊ कंकडालवार यांनी दाखवलेली मानवी धावपळ व्यर्थ

मोसम येथील बाजीराव सडमेक यांचे निधन…अजयभाऊ कंकडालवार यांनी दाखवलेली मानवी धावपळ व्यर्थ

4
0

अहेरी : तालुक्यातील मोसम गावातील रहिवाशी बाजीराव सडमेक यांनी विष प्राशन केल्याने घडलेली ही घटना अत्यंत हृदयद्रावक आहे.घटनेची माहिती मिळताच गावातील उपस्थित जगन्नाथ मडावी, सिनू राऊत,श्रीहरी सडमेक,रामा मडावी,प्रकाश पदमावार यांनी कोणतीही वेळ दवडता तातडीने आदरणीय नेते अजयभाऊ कंकडालवार यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला.परिस्थितीची गंभीरता लक्षात घेताच अजयभाऊंनी क्षणाचाही विलंब न लावता त्वरित गाडीची व्यवस्था करून बाजीराव यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले.गावकऱ्यांनी जीवाच्या आकांताने धावत जाऊन त्याला रुग्णालयात पोहोचवले.

परंतु अत्यंत दुर्दैवाने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाजीराव यांना मृत घोषित केले.गावकऱ्यांच्या जिवापाड प्रयत्नांनंतरही आणि अजयभाऊंच्या तातडीच्या मदतीनंतरही त्याला वाचवणे शक्य झाले नाही.

घटनेनंतरही अजयभाऊ कंकडालवार यांनी आपली सामाजिक जबाबदारी निभावत बाजीराव यांचे पार्थिव गावात पोहोचावे यासाठी वाहन व्यवस्थेची तातडीने व्यवस्था करून दिली.शोकाकुल कुटुंबाच्या पाठीशी उभे राहत त्यांनी सर्व आवश्यक मदत तत्काळ उपलब्ध करून दिली.

ही घटना केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूची नाही,ही एका कुटुंबाची विखुरलेली दुनिया,मातापित्यांच्या डोळ्यातील रिकामी झालेली आशा आणि संपूर्ण गावाच्या अंतःकरणात खोलवर उतरणारी वेदना आहे.

बाजीरावच्या जाण्याने गावात शोककळा पसरली असून,सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.गावकऱ्यांनी दाखवलेली तत्परता आणि अजयभाऊ कंकडालवार यांनी दाखवलेली मानवी संवेदनशीलता —
ही या दुःखातही माणुसकीचा मोठा आदर्श ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here