अहेरी : तालुक्यातील इंदाराम ( गेर्रा )येथील महिला कु.रविना सुरेश आत्राम ( वय 22 वर्षे )काल संध्याकाळी वेळी विषप्राशन घेतले होते.विष घेतलेल्या माहिती रविना आत्राम यांच्या आई वडिलांना व त्यांच्या नातेवाईकांना मिळतच त्या महिलांना तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केली होते.
सदर माहिती स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती देतच यांनी तात्काळ अहेरी उपजिल्हा रुग्णालय येते धाव घेत डॉक्टरांची व नातेवाईकांची भेट घेऊन महिला रुग्णांची परिपूर्ण माहिती घेतले.उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी चेकअप करून त्या महिलांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रेफर करण्यात आली.
दरम्यान अजयभाऊ कंकडालवार यांनी म्हणले की’तिकडे कोणत्याही अडचण आले तर मला सांगा मदत करण्यासाठी मी तयार अहो असे आत्राम परिवाराला सांगितले.
यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,कुमार गुरनुले,नरेश गर्गम,पिंटू मडावी,प्रवीण कोरेत,सलाम मामू,प्रमोद गोडसेलवार यांच्या सह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आत्राम परिवारातील नातेवाईक उपस्थित होते.





