Home अहेरी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून डॉक्टरेट पदवी बहाल झाल्याबद्दल अजय कंकडालवार यांचा सत्कार…सिरोंचा तालुक्यातील सर्व...

काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून डॉक्टरेट पदवी बहाल झाल्याबद्दल अजय कंकडालवार यांचा सत्कार…सिरोंचा तालुक्यातील सर्व निवडणुका ताकदीने लढण्याचे कंकडालवार यांचे कार्यकर्त्यांना ग्वाही

1
0

सिरोंचा : गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा निःस्वार्थ समाजसेवक अजयभाऊ कंकडालवार यांना दिल्ली येथील एका कार्यक्रमात समाजसेवी संस्थेकडून नुकताच त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करून त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
 
याचे औचित्य साधून सिरोंचा तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी अहेरी येथील कंकडालवार जनसंपर्क कार्यालयात अजयभाऊ कंकडालवार यांची भेट घेऊन त्यांचं शाल,श्रीफळ व पुष्पगुछ देऊन भव्य सत्कार केले.

या सत्कार कार्यक्रमानंतर अजयभाऊ कंकडालवार यांनी सिरोंचा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसोबत तालुक्यातील विविध ज्वलंत समस्या आणि आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सिरोंचा नगरपंचायत निवडणुकीची नियोजनाबाबत प्रदीर्घ चर्चा केले.

यावेळी सत्कारमूर्ती अजयभाऊ कंकडालवार यांनी सिरोंचा तालुक्यात पक्ष संघटन मजबुतीसह तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका आणि सिरोंचा नगरपंचायतची निवडणूक आपला काँग्रेस पक्ष स्वबळावर अन संपूर्ण ताकदीने लढण्याची त्यांनी पदाधिकाऱ्यांना ग्वाही दिली.

काँग्रेस नेते डॉ.अजयभाऊ कंकडालवार यांच्या सत्कार प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आकूला मल्लिकार्जुनराव, सिरोंचाचे माजी उपसरपंच रवीभाऊ सल्लम,बाजार समितीचे संचालक नागराजू इंगीली,नगरसेवक मारोती गणपूरपू,मरपल्लीचे माजी उपसरपंच कार्तिकस्वामी तोगम,स्वीकृत नगरसेवक प्रशांत गोडशेलवार, सोशल मीडिया समन्वयक संपत गोगुला,प्रकाश दुर्गे,प्रमोद गोडशेलवारसह ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here