अहेरी टुडे तालुका प्रतिनिधी चामोर्शी ( Chamorshi )
चामोर्शी : जिल्हा परिषद व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अतुल गण्यारपवार यांना ठाणेदार राजेश खांडवे यांनी 20 एप्रिल ला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा निषेध म्हणून चामोर्शी येथील सर्व बाजारपेठ दिनांक 22 एप्रिल शनिवारला बंद ठेवण्यात आली. तसेच मारहाण करणाऱ्या ठाणेदाराविरुद्ध त्वरीत कारवाई करण्याची मागणी आर्य वैश्य संघटना चामोर्शी, अतुल गण्यारप वार मिञ परीवार व अनेक सामजिक संघटना व सहकारी क्षेत्रातील विवीध सहकारी संस्थेचे अध्यक्ष, व सचिवांनी केली आहे. या बंदला चामोर्शी शहरातील व्यापारी, छोटे व्यावसायिक यानी आपली दुकाने बंद ठेवून उस्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पहावयास मिळाले. या मारहाण प्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्याकडे चौकशी सोपवली असून याप्रकरणी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.