Home अहेरी ग्रामीण भागातील कोणीही विध्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये : अजय कंकडालवार

ग्रामीण भागातील कोणीही विध्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये : अजय कंकडालवार

8
0

अहेरी : तालुक्यातील देवलमरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत आज शाळेच्या पहिल्या दिवशी १ ली च्या विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तक व पुष्पगुच्छ देवून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते नवगत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक विध्यार्थ्यानी शाळेत जाऊन शिक्षण घ्यावी,आपल्या परिसरातील आजूबाजूला कोणीही विध्यार्थी शिक्षणा पासून वंचित असेल तर,गावातील शाळेचे शिक्षकांना याची माहिती द्यावी,प्राथमिक शाळेतील पहिला दिवस हा प्रत्येक पालक आणि मुलासाठी खूप खास असतो.कारण ही फक्त शिक्षणाचीच नाही,तर त्यांच्या आयुष्यातील एका नव्या आणि रोमांचक अध्यायाची देखील सुरुवात असते.

परंतु पहिल्या दिवशी शाळेत जाताना अनेक मुलांना भिती वाटते आणि ते रडतात.त्यामुळे या दिवसासाठी योग्य आणि समजूतदारपणे तयारी करणे आवश्यक म्हणून माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी येथील उपस्थित शिक्षकांना  पालकांना सांगून विध्यार्थी,विध्यार्थ्यांना पुष्प गुच्छ,बुक पेन,चॉकलेट देऊन वर्गात स्वागत करण्यात आली आहे.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,सुधाकर लेखूर,अक्षय अल्लेवार,सत्यम रामगीरी,सावित्रीबाई आत्राम,शारदाताई,अनिताताई,विमलाबाईसह स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here