Home अहेरी काँग्रेस नेते कंकडालवार यांचे सोबत कापेवार समाज बांधवांची विविध समस्यांवर चर्चा संपन्न

काँग्रेस नेते कंकडालवार यांचे सोबत कापेवार समाज बांधवांची विविध समस्यांवर चर्चा संपन्न

15
0

अहेरी : तालुक्यातील ताटीगुडम येथील कापेवार समाज बांधवांनी गावातल्या विविध समस्यांवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचेसोबत चर्चा घडवून आणले.

काँग्रेस नेते कंकडालवार हे रेपनपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यानिमित्त ताटीगुडम गावात नुकताच दौरा केले होते.यावेळी येथील कापेवार समाज बांधवांनी त्यांचे सोबत पिण्याचे पाणी, रस्ते,वीज,आरोग्य समस्या तसेच समाजमंदिर बांधकामाविषयी चर्चा केले.यावेळी काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी गावातल्या समस्या सोडवून देण्याचे कापेवार समाज बांधवांना आश्वासन दिले.कापेवार समाज बांधवांसोबत चर्चेदरम्यान कंकडालवार यांचे समवेत स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here